about
GET TO KNOW ABOUT US

अक्षरगंगा पब्लिकेशन, सांगली.

अक्षरगंगा पब्लिकेशन, सांगली या संस्थेची स्थापना श्री. चंद्रकांत सोळंकी यांनी केली. शालेय स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून आपल्या अनुभवाचे लहानसे गाठोडे घेऊन वाटचालीला सुरुवात केली. ही सुरुवात करताना अनेक आकांक्षा आणि चांगलेच काम करण्याची आंतरिक उर्मी यामुळे उत्कृष्ठतेच्या पायवाटेकडे पावले वळली. प्रत्येक विषयांची विविधता आणि दर्जेदार निर्मिती ही 'अक्षरगंगापब्लिकेशनची' ओळख व्हावी या ध्येयाने काम सुरु झाले आणि अल्पावधीतच खूप वेगवेगळ्या विषयांची पुस्तके अक्षरगंगा पब्लिकेशनने प्रकाशित केली.